जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी १६ मार्च रोजी निवडणूक

रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीसाठी नियुक्त पिठासन अधिकारी यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ व त्याखालील नियमातील तरतुदीनुसार १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे जिल्हा परिषद सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा बोलावून त्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घ्यावी, असे उप जिल्हाधिकारी (सा.प्र.) विश्वजित गाताडे यांनी आदेशित केले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम ४५ पोटकलम २ अन्वये रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा १६ मार्च २०२६ रोजी बोलावून त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणूका घेण्याकरिता पिठासन अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सर्व नऊ पंचायत समित्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम होऊन महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६२ च्या कलम ६६ नुसार जिल्ह्यातील नवनिर्वाचित सदस्यांची नावे ११ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहेत. पंचायत समित्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियमाच्या कलम ४५ अन्वये विहीत केलेल्या पद्धतीनुसार या विशेष सभेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडणूक घेणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button