
जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन स्थानिक सुट्या जाहीर
रत्नागिरी, दि. 24 ):- जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरिक्त तीन सार्वजनिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकाऱ्यांनी सन 2026 या वर्षासाठी होळी सणानिमित्त सोमवार 2 मार्च, अनंत चतुर्दशीनिमित्त शुक्रवार 25 सप्टेंबर आणि धनत्रयोदशी निमित्त शुक्रवार 6 नोव्हेंबर 2026 अशा तीन सुट्टया जाहीर केल्या आहेत.
याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रसिध्दीस दिली आहे.




