चिपळूण शहरात मुख्य बाजारपेठेत धूम स्टाईल मोटरसायकलस्वारांचा धुमाकूळ


चिपळूण शहरातील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत दिवसेंदिवस धूम स्टाईलने दुचाकी चालवणार्‍या दुचाकीस्वारांची दहशत वाढत चालली आहे, त्यांच्या या हुल्लडबाजीमुळे रविवारी दुपारी एका धूमस्टाईल दुचाकीस्वाराने सायकलस्वाराला धडक दिल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या अपघातानंतर दुचाकीचे मडगार्ड तुटून ते १५ फूट लांब उडाले. त्या जखमी सायकलस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, हुल्लडबाज धूम स्टाईल दुचाकीस्वारावर पोलिसांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
गेली काही महिन्यापासून मुंबई-गोवा महामार्गासह बाजारपेठ शिवाय अंतर्गत शहरातील अंतर्गत रस्त्यावर धुम स्टाईलचे दुचाकी चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे यात प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुणांचा समावेश असून अशा धूमस्टाईलने दुचाकीस्वाराची दहशत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button