
चिपळूण शहरातील प्रौढाचा हॉटेलमध्ये जेवणादरम्यान व्यक्तीचा अचानक मृत्यू
चिपळूण शहरातील पाग कासकरआळी येथील रहिवासी फैयाज हसन कासकर (५५) यांचा जेवणादरम्यान अचानक मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी दुपारी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान फैयाज कासकर हे चिपळूण येथील हॉटेल सदगुरू येथे जेवणासाठी गेले होते. जेवण सुरू असतानाच त्यांना अचानक उलटी होवून ते खाली कोसळले. ही बाब लक्षात येताच हॉटेलमधील कामगारांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी कामथे येथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र रूग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.www.konkantoday.com




