चिपळूण येथे बांबू लागवड व प्रक्रिया उद्योगावर महत्त्वपूर्ण बैठक

‘हिरवे सोन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांबूकडे वळण्याचे पाशा पटेल यांचे आवाहन

दे

चिपळूण : सुवर्ण कोंकण फार्मर प्रोड्यूसर कंपनी, चिपळूण यांच्या पुढाकाराने बांबू लागवड, प्रक्रिया उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध विविध योजनांबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक, शेतकरी चळवळीतील नेते व धोरण अभ्यासक पाशा पटेल प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

पटेल यांनी शाश्वत शेती, पाणी व्यवस्थापन आणि पर्यायी उत्पन्न स्रोत याबाबत राज्य व राष्ट्रीय पातळीवर सातत्याने भूमिका मांडली असून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी ते कार्यरत आहेत.
कोकण प्रदेश डोंगराळ, उताराचा व जास्त पर्जन्यमानाचा असल्याने येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. अतिवृष्टी, अनियमित पाऊस, दीर्घ कोरडे कालखंड आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने निर्माण होत असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टीमुळे मृदा धूप होऊन सुपीक माती वाहून जाते, तर पावसाचा खंड पडल्यास बागायती पिकांचे नुकसान होते. हवामान बदलामुळे कीड व रोगांचे प्रमाणही वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात, कमी देखभालीत आणि हवामान बदलाला तोंड देणारे पर्यायी पीक म्हणून बांबू हा अत्यंत उपयुक्त पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत उपस्थित सदस्यांनीही कोकणात बांबू लागवड व प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस कंपनीचे चेअरमन प्रकाश (बापू) काणे, रामशेठ रेडीज, डॉ. गौरव बारटक्के, मिलिंद जोगलेकर, श्रीकृष्ण वाभळे, महेश जाधव, प्रल्हाद (बाळा) लाड, विश्वनाथ सकपाळ, मनोज गांधी तसेच कृषी विभागाचे शिवाजी शिंदे (उपविभागीय कृषी अधिकारी), शत्रुघ्न म्हेत्रे (तालुका कृषी अधिकारी, चिपळूण), विकास पिसाळ (मंडळ कृषी अधिकारी) व संतोष जाधव (सहाय्यक कृषी अधिकारी) उपस्थित होते.

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button