चिपळूण नगर परिषद ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये कोकण विभागात प्रथम

७५ लाखांचे पारितोषिक जाहीर


‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत कोकण विभागातील सर्व नगर परिषदांमध्ये चिपळूण नगर परिषदेने गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही प्रथम क्रमांक पटकावला असून नगरपरिषदेला ७५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या यशामागे तत्कालीन प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मेहनतीसह त्यांच्या कल्पक नियोजनाचे विशेष कौतुक होत आहे.

चिपळूण नगर परिषदेला ‘माझी वसुंधरा’ अभियानात सातत्याने यश मिळत असून, यावर्षीही अभियानातील सर्व आवश्यक निकष पूर्ण करत विविध पर्यावरणपूरक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. सायकल डे, स्वच्छता, हरित उपक्रम आदी कार्यक्रम नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे विशेष लक्षवेधी ठरले. प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळेच चिपळूणने कोकण विभागात अव्वल स्थान पटकावले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल तत्कालीन प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी चिपळूण शहरातील सर्व नागरिक, सर्व पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचे आभार मानले आहेत. तसेच नगरपरिषदेतील उद्यान विभागासह सर्व विभागांचे प्रमुख, आजी-माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, खासदार व पालकमंत्री यांचेही सहकार्याबद्दल त्यांनी मनापासून धन्यवाद व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button