
चिपळूण तालुक्यात वादातून डोक्यात दगड मारून केली दुखापत
चिपळूण तालुक्यात वादातून एकाने दुसर्याच्या डोक्यात दगड मारून त्यास दुखापत केल्याची घटना सीमवारी सकाळी ९.३० वाजता तालुक्यातील सावर्डे खोतवाडी-कदमवाडी येथे घडली. यात एकजण जखमी झाला असून याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात मारहाण करणार्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर चंद्रकांत घाग (३५, सावर्डे-खोतवाडी) जखमीचे नाव आहे. श्रीधर शंकर चव्हाण, जयश्री श्रीधर चव्हाण (सावर्डे-खोतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सागर चंद्रकांत घाग यांनी दिली आहे/पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर घाग हे त्याच्या घराच्या कंपाऊंडमध्ये वाडीतील लोक कवळ तोडीत होते. त्यावेळी घाग व त्याची पत्त्नी यांनी त्यांना, आमच्या कंपाऊंडमधील कवळ कोणाला विचारून तोडत आहात असे विचारत असता तेथे श्रीधर चव्हाण, जयश्री चव्हाण यांनी घाग व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून अंगावर मारण्यास आले. तसेच श्रीधर चव्हाण यांनी तेथे असलेला दगड घाग यांच्या डोक्यात फेकून मारल्याने त्यांना दुखापत झाली. या मारहाण प्रकरणी श्रीधर चव्हाण, जयश्री चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com




