
चिपळूण तालुक्यातील दळवटणे परिसरात वणवा
चिपळूण तालुक्यातील दळवटणे येथील रामवाडी परिसरात बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास भीषण वणवा लागला. काही वेळातच या वणव्याने उग्र स्वरुप धारण केल्याने परिसरात धुराचे मोठमोठे लोट पसरले. परिसरातील आंबा कलमे तसेच इतर फळबागा आगीच्या भक्षस्थानी सापडल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नदी परिसरात चरण्यासाठी गेलेली गुरेही आगीच्या कचाट्यात अडकली होती.. वणव्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संदीप कदम, रमेश शिंदे, रमेश महाडिक, रमेश पवार, वैभवी थोरे, साक्षी मोहिते आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. वणव्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
www.konkantoday.com




