
चिपळूण एसटी बस स्थानकात महिला प्रवाशाच्या पर्समधून पाच लाख रुपये चोरट्यानी केले लंपास
चिपळूण तालुक्यातील मौजे मुंढे सावर्डे कोरनाकवाडी येथे राहणार्या प्रज्ञा प्रशांत हरेकर (३८) या काल चिपळूण एसटी स्थानकातून चिपळूण ते वीर बंदर या एसटी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून तिच्याजवळ असलेल्या सॅकची चेन उघडून त्यामध्ये ठेवलेले पाच लाख रुपये रोख चोरून नेले. चोरीची घटना लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार काल सायंकाळी पावणेचार वाजता चिपळूण स्थानकात घडला.www.konkantoday.com




