चिपळूण असुर्डे येथे भर धाव कारची पदाचाऱ्याला धडक , पादचाऱ्याचा जागीच मृत्यू दुसऱ्या वाहनालाही धडक


मुंबईहून संगमेश्वरकडे जात असताना बेदरकारपणे वाहन चालविल्याने झालेल्या तिहेरी अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. ही घटना तालुक्यातील असुर्डे (ता. चिपळूण) येथे सकाळच्या सुमारास घडली.

सावर्डे पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार अशोक मादगे (वय ३५, रा. साडवली, देवरुख) हे आपल्या होंडा कारने पुणे येथून साडवलीकडे प्रवास करत होते. त्यांच्या सोबत पत्नी रूपाली व मुलगी साजिरी होत्या. असुर्डे बौद्धवाडी परिसरात त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले होते.
दरम्यान, मुंबईहून संगमेश्वरकडे जाणारी एर्टीगा कार गिरीश चंद्रकांत गावडे (रा. माहीम, मुंबई) हे भरधाव व बेदरकारपणे चालवत असताना प्रथम पादचारी विजय बाबाराम सावर्डेकर (रा. असुर्डे) यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मादगे यांच्या मोटारगाडीला धडक दिली.

या भीषण अपघातात पादचारी विजय सावर्डेकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून संबंधित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button