
चिपळुणात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत कमालीची वाढ
चिपळूण शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. बरदिवशी ती नागरिक, लहान मुले बांच्या अंगावर येत असल्याने त्यांची बहशत वाढली आहे. यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली असून नगर परिषदेने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भटक्या कुत्र्यांसह उनाड गुरे, गाढवे यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भडक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच शहरातील विविध भागात मुख्य रस्त्यांवर उनाड गुरे कायम दिसून येतात. त्यांच्यामुळे अपघात होण्यासह वाहतूककोंडी होताना दिसत आहे. मात्र तरीही यावर कोणीही विचार करताना दिसत नाही. गाढवांचा वावर तर कायमच असून त्यांच्यामुळे अनेक गंभीर अपघात झाले आहेत. मध्यंतरी नगर परिषदेने संबधित मालकांना तंबी दिली होती. त्यानंतर काही दिवस गाढवे दिसत नव्हती मात्र आता पुन्हा शहरात त्यांचा धुमाकूळ सुरू आहे.www.konkantoday.com




