चिपळुणात नारायण तलाव येथे नमाज पठण, हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक


चिपळूण नगरपरिषद मालकीच्या शहरातील नारायण तलाव येथे ३० जानेवारी रोजी सायंकाळी नमाज पठण करण्याचा प्रकार घडला. यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक झाल्या असून याप्रकरणी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच पोलीस निरीक्षक फुलचंद मेगंडे यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
चिपळूण शहरातील नारायण तलाव येथे दररोज नागरिक, बच्चे कंपनी यांची गर्दी असते. असे असताना ३० जानेवारी रोजी सायंकाळी मुस्लिम समाजातील काही स्त्री, पुरुषांनी येथे नमाज पठण केले. यावेळी उपस्थित अन्य नागरिकांनी त्यांना ही सार्वजनिक जागा असून येथे असे करू नये असे सांगितले. तरीही ते ऐकले नाहीत असे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी सोमवारी नगराध्यक्ष सकपाळ यांना संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button