
घरातून अडीच लाखांचे दागिने लंपास
खेड तालुक्यातील कशेडी ओझरवाडी येथे भाचीच्या लग्नासाठी आलेल्या विवाहितेचे २ लाख ५८ हजार ७३६ रुपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुरूवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
वैशाली विनायक सुर्वे (५२, रा. घोणसेगाव-म्हसळा, सध्या रा. अंधेरी-मुंबई) यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ही घटना ३ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत घडली. सदर घटना विजय नारायण दरेकर यांच्या घरी घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. वैशाली सुर्वे त्यांचा भाऊ विजय दरेकर यांच्या घरी भाचीच्या लग्नासाठी आल्या होत्या. अज्ञात चोरट्याने त्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये १ लाख ७५ हजार २४२ रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, १८ हजार ४४६ रुपये किंमतीचे ब्रेसलेट ६५ हजार किंमतीचा नेकलेस आदी दागिन्यांचा समावेश आहे. दागिने चोरीस गेल्याची बाब निदर्शनास येताच वैशाली सुर्वे यांनी पोलीस ठाणे गाठत रितसर तक्रार नोंदवली.
www.konkantoday.com




