
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे दारूच्या नशेत गळफास लावून आत्महत्या
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे मुख्य रस्त्याच्या शेजारी ४५ वर्षीय विठ्ठल उमलू चव्हाण याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. तालुक्यातील मोडका घर ते वेळणेश्वरच्या दरम्यान मुख्य रस्त्याशेजारी माळरानामध्ये फांदीला दारूच्या नशेत गळफास लावून मृतावस्थेत आढळला. चव्हाण हा मुळचा विजापूरचा असून तो सध्या वेळणेश्वर इंजिनिअरिंग कॉलेज समोरील जागेमध्ये असलेल्या झोपडीत रहात होता. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com




