गावखडीतील श्री देव रामेश्वर महाशिवरात्र उत्सवाला १२ फेबुवारीपासून प्रारंभ

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडीचे जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर महाशिवरात्र उत्सवाला १२ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणारआहे.
१२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक, शिवपूजा, ७.४५ वाजता रामेश्वराच्या ध्वजाची पूजा, सकाळी ८ वाजता पिपळपार पूजा, ८.३० वाजता क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन, सकाळी ९ वाजता ९ होमहवन, नवग्रह शांती, दुपारी २ वाजता पुराण कथन प्रकाश फडके, ३ वाजता हभप विद्याधर करंबळेकर (राजापूर) यांचे कीर्तन, रात्री ८ वाजता आरती (मानकरी तोडणकरवाडी, नानरकरवाडी), १०.३० वाजता वसंत कानेटकर लिखित “प्रिय आईस” ya नाटकाचे श्री रामेश्वर रंगभूमी (गावखडी) यांच्या वतीने सादरीकरण.
१३ फेब्रुवारी सकाळी ७ वाजता अभिषेक, शिवपूजा, क्रीडा स्पर्धा, दुपारी २ वाजता प्रकाश फडके यांचे पुराण कथन. ३ वाजता हभप विद्याधर करंबळेकर (राजापूर) यांचे कीर्तन, रात्री ८ वाजता भोवती, आरती (मानकरी सुरकरवाडी, पड्यारवाडी) रात्री १०.३० वाजता प्रल्हाद जाधव लिखित “विठू माझा लेकरूवाळा” या नाटकाचे श्री सिद्धिविनायक नाट्य मंडळ (गावखडी) यांच्या वतीने सादरीकरण.
१४ फेब्रुवारी सकाळी ७ वाजता अभिषेक, शिवपूजा, दुपारी २ वाजता प्रकाश फडके यांचे पुराण कथन, ३ वाजता हभप विद्याधर करंबळेकर यांचे कीर्तन, रात्री ८ वाजता भोवती, आरती (मानकरी तरयेवाडी, बंडबेवाडी), रात्री १०.३० वाजता स्वप्नील जाधव लिखित “अस्तित्व” नाटकाचे साई प्रतिष्ठान (गावखडी, मुंबई) यांच्या वतीने सादरीकरण.
१५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता लघुरूद, शिवपूजा, सकाळी ८ वाजता क्रीडा, ९ वाजता शिवदर्शन, स्थानिक भजने, १० वाजता महिलांसाठी हळदी-कंकू समारंभ, दुपारी २.३० वाजता प्रकाश फडके यांचे पुराण कथन, ३.३० वाजता कीर्तन हभप विद्याधर करंबळेकर (राजापूर), सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव, रात्री ८ वाजता भोवती, आरती (मानकरी शिवगणवाडी, सुतारवाडी, पेटकरवाडी, मुडेवाडी), रात्री १०.३० वाजता प्रशांत दळवी लिखित “ध्यानी मनी” नाटकाचे सिद्धाई कान्हाई रंगभूमी (गावखडी) यांच्या वतीने सादरीकरण.
१६ फेब्रुवारी सकाळी ७ वाजता अभिषेक, शिवपूजा, ८ वाजता क्रीडा स्पर्धा, दुपारी २ वाजता दुपारी २ वाजता प्रकाश फडके यांचे पुराण कथन, त्यानंतर हभप विद्याधर करंबळेकर यांचे कीर्तन, रात्री ८ वाजता भोवती, आरती (मानकरी कुंभारवाडी), रात्री १०.३० वाजता बक्षीस वितरण समारंभ, रात्री ११ वाजता सचिन मोटे लिखित “भटाची बायपास” नाटकाचे सुदर्शन धर्माजी तोडणकर (गावखडी, मुंबई) यांच्या वतीने सादरीकरण. नाट्यप्रयोग संपल्यावर पहाटे लळिताचा कार्यक्रम होईल.
१७ फेब्रुवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ यांच्या सौजन्याने महाप्रसादाचे वाटप.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button