खेड तालुक्यातील बहिरवली-करंबवणे पूल अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश, मंत्री आ. योगेश कदम यांच्या पाठपुराव्याला यश


खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील बहिरवली-करंबवणे या जगबुडी, वाशिष्टी खाडीवरील पुलाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सततच्या पांठपुराव्याला अखेर यश आले आहे. या पुलामुळे खाडीपट्ट्याच्या दळणवळण, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. बहिरवली ते करंबवणे पुलाच्या मागणीचे निवेदन दोनच महिन्यापूर्वी खाडीपट्टा विभागातील सरपंच, विभागप्रमुख, कुणबी समाज व मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना दिले होते. मंत्री कदम यांनी मागणीची गंभीर दखल घेत शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेत पुल उभारणीबाबत चर्चा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुलाची उपयुक्तता आणि गरज लक्षात घेत संबंधित विभागाला पुलाची सविस्तर अंदाजपत्रक व तांत्रिक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. प्राथमिक अधिकार्‍यांकडूनही पाहणीसह आवश्यक माहिती संकलन आणि तांत्रिक बाबींची चाचपणी सुरू केली आहे. अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया गती मिळणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button