
खेड तालुक्यातील ऐनवरे येथे बेकायदेशीर जमाव,१० महिलांवर गुन्हा
खेड तालुक्यातील ऐनवरे येथे बेकायदेशीर जमाव करत एका महिलेस काठीने मारहाण तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात १० महिलांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुप्रिया सुहास जाधव, राखी राकेश जाधव, सुवर्णा सुभाष जाधव, मंगला संदीप जाधव, वनिता जाधव, अजिता अजित जाधव, सुगंधा तुळशीराम जाधव, सुमन पाडुरंग जाधव, अरूणा मधुकर जाधव (सर्व रा. ऐनवरे-फौजदारवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत रोहिणी सुभाष जाधव (३५ रा. ऐनवरे-फौजदारवाडी) यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारदार महिलेस वाळीत टाकलेली क्लिप व्हायरल केली म्हणून संशयितांना राग आला. एकमेकांच्या संगमताने व सहाय्याने जमाव करत तक्रारदार महिलेस बांबूच्या काठीने मारहाण करत शिवीगाळ केली. ही घटना १६ रोजी दुपारी ३ वाजता घडल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.www.konkantoday.com




