
कोकण रेल्वे आस्मा संघटना अध्यक्षपदी दिनेश चव्हाण
कोकण रेल्वे आणि रेल्वे ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय लीडरशिप ट्रेनिंग कॅम्प सावंतवाडी नवसरणी येथे नुकताच उत्साहात पार पडला. या निमित्ताने ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशन (आस्मा) या संघटनेच्या कोकण रेल्वे संघटनेची वार्षिक सभादेखील आस्माच्या केंद्रीय पदाधिकार्यांच्या उपस्थितीत झाली. या सभेत आस्माच्या कोकण रेल्वे विभागीय अध्यक्ष म्हणून सावंतवाडी स्थानकाचे वरिष्ठ स्टेशन मास्टर दिनेश चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आस्माच्या केंद्रीय कमिटीच्या उपस्थितीत नवनियुक्त कमिटी दोन वर्षासाठी एकमताने निवडण्यात आली. अध्यक्ष निवडीनंतर दिनेश चव्हाण यांनी आस्माच्या केंद्रीय कमिटीचे व नवनियुक्त कार्यकारिणीचे तसेच कोकण रेल्वेच्या सर्व स्टेशन मास्टर सहकायांचे धन्यवाद व्यक्त करताना सांगितले की, माझ्या खांद्यावर संघटनेने जी जबाबदारी दिली आहे, त्याला योग्य तो न्याय देत माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या साथीने केला जाईल. कोकण रेल्वेच्या सर्व स्टेशन मास्टर्सची एकजूट बळकट करणे, त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रशासनासोबत चर्चा करणे व प्रसंगी संघर्ष करणे, एकमेकांविषयी व संघटनेविषयी आपुलकीची भावना निर्माण होणे आवश्यक आहे.
www.konkantoday.com




