कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक कृतज्ञता सोहळा १४ रोजी


कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा साहित्य समाज कृतज्ञता सोहळा व नागरी सत्कार प्रकट मुलाखत कार्यक्रम १४ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावकर नाट्यगृहात सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेची जिल्हा कार्यकारिणी मंडळाची बैठक रविवारी झाली. या बैठकीत महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने हा कार्यक्रम होत आहे.
या समारंभाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास १०० हून अधिक साहित्यिक व कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य सहभागी होणार आहेत, असे नियोजन बैठकीत स्पष्ट करण्यात आले. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग मंडळाची कार्यकारिणी बैठक अध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी रत्नागिरी येथे होणार्‍या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम जिल्हा सचिव ऍड. संतोष सावंत यांनी बैठकीच्या नियोजनासंदर्भात माहिती करून दिली. त्यानंतर मस्के यांनी कर्णिय यांचा नागरी सत्कार होणार असल्याचे सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button