कोकण पर्यटन ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराराज्यमंत्री योगेश कदम


मुंबई, दि. 27 फेब्रुवारी 2026 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या अपार संधी आहेत. या भागात देश विदेशातील पर्यटक येत असतात. कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत दापोली तालुक्यात पर्यटक सुविधांची कामे सुरू आहेत. या पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत दर्जेदार स्वरूपाची कामे करून पर्यटकांसाठी उत्तम सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना गृह (गा्रमीण) राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित कोकण पर्यटन ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत दिल्या.
बैठकीस मंत्रालयात ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव सुभाष इंगळे, चिपळुण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हर्षल चव्हाण उपस्थित होते, तर दुरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी बेठकीत सहभाग घेतला.
कामांचा आढावा घेत असताना राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, गावातील बचत गटांचा कोकण पर्यटन ग्रामीण विकास कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यात यावा. बचत गटाच्या सूचनांचाही अंतर्भाव करण्यात यावा.कर्दे ग्रामपंचायत हद्दीतील प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे पूर्ण करावी. या कामांसाठी मिळालेला निधी विहीत कालावधीत खर्च होण्याची दक्षता घ्यावी. कामांच्या दर्जाबाबत तडजोड केल्या जाणार नाही. कर्दे खाडीवर पूल बांधणे, खाडी येथे संरक्षक बंधारा बांधणे तसेच कर्दे येथे समुद्र किनाऱ्यालगत सांस्कृतिक संकुल बांधकाम या कामांसाठी सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) ची परवानगी मिळण्याची कार्यवाही पूर्ण करावी. कर्दे परीसरात पायाभूत सुविधांची कामे गतीने पूर्ण करावी, असेही राज्यमंत्री योगेश कदम यांनी सूचीत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button