
कोकणात ओल्या काजूगराचे आगमन, दर मात्र आवाक्याबाहेर
कोकणात आंबा व काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोकणातील हापूस आंबा व काजू जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात पाठवले जातात. सध्या सुक्या काजूपेक्षा ओल्या काजूगराला बाजारात अधिक मागणी असून ओले काजूगर विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाल्याचे चित्र आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमेश्वर बाजारपेठेत कैर्या व काजूबी विक्रीसाठी दाखल झाल्या असून ग्राहकांकडून त्यांना चांगली पसंती मिळत आहे. मात्र यावर्षी अवकाळी पाऊस व दाट धुक्यामुळे शेतकरी व बागायतदार वर्ग त्रस्त झाला आहे. सुरूवातीला आलेला मोहर अवकाळी पावसामुळे काळवंडला असला तरी शेतकर्यांनी योग्य काळजी घेत बागायतीचे रक्षण केले. सध्या बागांमध्ये तयार झालेल्या कैर्या व काजूगर विक्रीसाठी बाजारात उपलब्द झाले आहेत. मात्र उत्पादन घटल्याने कैरी व काजूगरांचे दर चढे आहेत. बाजारपेठेत काजू प्रतिकिलो सुमारे २५० रुपये तर ओला काजूगर सुमारे १२०० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
www.konkantoday.com



