कोकणची खाद्य संस्कृती नवनिर्माण ने सातासमुद्रापार न्यावी : उदय सामंत


एस पी हेगशेट्ये कॅालेज ॲाफ हॅाटेल मॅनेजमेंट ॲड हॅास्पीटॅलीटी तर्फे आयोजित भव्य थीम डिनर “ विलुप्त कोकण “ चे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते अत्यंत भव्य दिव्य अशा शानदार सोहळ्यात झाले. यावेळी मार्गदर्शन करतांना ते म्हणाले. महाविद्यालयीन विद्यार्थी , जनता आणि लोकप्रतिनिधी मिळून एकत्र येत कोकणची खाद्यसंस्कृती जतन करण्याचा आणि ती जोपासण्याचा हा प्रयत्न अत्यंत विशेष उल्लेखनीय आहे. नवनिर्माण हॅाटेल मॅनेजमेंट महाविद्यालयांने कोकणची खाद्य संस्कृती सातासमुद्रापार न्यावी अशी अपेक्षा आहे.
विलुप्त कोकण या कार्यक्रमाला सगुणा बाग या कृषी पर्यटन ( कर्जत) चे चंदन भडसावळे यानी कृषी पर्यटनातील आपली वाटचाल आज आठवड्याला १००० पर्यटकांपर्यंत गेल्याचे सांगितले. कोकणातील प्रत्येक गाव , वाडी, डोंगर नद्या ह्या पर्यटकांना आकर्षित करत आहेत. नवनिर्माण च्या विशेष विलुप्त खाद्य महोत्सवातून पर्यटनाला नव्या कल्पना आणि चालना मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कोकणची पारपारिक कोकण संस्कृती जपतांना सावरलेले अंगण , दारात गाय गुरे कोंबड्या हे एकमेकांना पुरक सुत्र जपले तरच कोकणचा गावगाडा सुरक्षीत आणि विकसित होईल. या खेड्यातून होणारे शहरीकरण थांबवणे आवश्यक आहे. असे मल्हार इंदूलकर यांनी सांगितले.
मुंबईची नोकरी सोडून गावच्या शेतीत रमणारा विनीत विचारे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना रानमाणूस फाऊंडेशन वतीने आम्ही अनेक तरुण जनजागृती आणि कोकणात स्थायिक होण्याचे आवाहन करत असल्याचे सांगतांना बदल तरुणांच्या विचारात होत असल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष मा. शिल्पा सुर्वे यांनी नवनिर्माण च्या विलुप्त कोकण उपक्रमाला विरोध शुभेच्छा दिल्या.
विलुप्त कोकण ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नवनिर्माण हॅाटेल मॅनेजमेंटचे प्रा. ताराचंद ढोबळे, प्रा. मेघना शेलार , प्रा. खांडेकर विद्यार्थी प्रतिनिधी रुद्र जाधव आणि संपूर्ण हॅाटेल मॅनेजमेंट टिम मागील पुर्ण एक महिना मेहनत घेत आहे. यांतील शिवकालीन खाद्य पदार्थ आणि खाद्य संस्कृती यांत तिवाल, पंगोजी, शहाळे काजू तोंडाक, गरम हुलग्याचे मांडगे, किसमुर, कोलीम भजी, आंबोळी, खांतोली या वैविध्यपूर्ण पदार्थांना शोधणे हा एक आरएनडी भाग होता. हे संशोधन हॅाटेल मॅनेजमेंट टिमने केले. या बद्दल विशेष अभिनंदन करतांना चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी सांगितले की, विलुप्त कोकण हा खाद्यमहोत्सव कोकणच्या पर्यटनवृध्दिचा महत्वपुर्ण भाग ठरणार आहे. या कार्यक्रमात संस्था उपाध्यक्ष , रत्नागिरीतील प्रतिथयश डॅाक्टर डॅा. अलिमियॅा परकार, संस्था संचालक सीमा हेगशेट्ये , मृत्यूंजय खातू, डॅा. केतन चौधरी , बिपीन बंदरकर, राहूल पंडीत आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाला रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. सोबत नमन चालले लंडनला हा बहारदार कार्यक्रमाने रंगत अधिक वाढविली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button