
केंद्रीय अर्थसंकल्प सादर; काय स्वस्त, काय महाग?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारमण यांनी देश गेल्या १२ वर्षापासून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले. देशात गुंतवणूक देखील वाढत असून, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्यावर आमचा भर आहे, असे त्यांनी नमूद केले. अर्थसंकल्पातून काय स्वस्त आणि काय महाग झाले याची यादी आता समोर आली आहे.
काय स्वस्त?
निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्करोग आणि मधुमेहावरील औषघं स्वस्त होणार आहेत. मोबाईल फोन आणि ईव्ही बॅटरीही स्वस्त होणार आहेत.
वैद्यकीय उपकरणे
भारतात तयार होणारी कपडे
कर्करोग, मधुमेहावरील औषधं
क्रीडा साहित्य
मोबाईल फोन
अपघात विमा
लिथियम आयन बॅटरी
दुचाकी
एलसीडी, एलईडी
सौर पॅनेल
ईव्ही वाहने, ईव्ही बॅटरी
फ्रोझन फूड
काय महाग?
दारु
खनिज
शूज
पीव्हीसी फ्लेक्स शीट




