
करबुडे-रत्नागिरी रस्त्यावर दुचाकीला धडक देणार्या कारचालकावर गुन्हा
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे-रत्नागिरी रस्त्यावरील शीळ येथे दुचाकीस्वाराला धडक देणार्या कारचालकावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल संगाप्पा येनेगुरे (५७, रा. लातूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना ३० जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली होती. यामध्ये दुचाकीवरील तरूणाचा मृत्यू झाला होता. यल्लप्पा दर्याप्पा जगदाने (३१, रा. नराळे, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे मृत तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० जानेवारी रोजी रविराज विनोबा राजके (२८, रा. सातारा) हे यल्लाप्पा जगदाने यास दुचारी (एमएच ४५ एके २८७२) वरून घेवून करबुडेहून रत्नागिरीकडे यत होते. दुपारी १ वाजता शीळ येथे आले असता कार (एमएच ०८ झेड ३२६५) ने रविराज याच्या ताब्यातील दुचाकीला धडक दिली. यामध्ये यल्लप्पा याचा मृत्यू झाला. रविराज राजके जखमी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक अनिल येनेगुरे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com



