ओमळी येथे मोटारसायकलवरून पडून गंभीर जखमी झालेल्या चिपळूणमधील एका ५९ वर्षीय महिलेचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू


ओमळी येथे मोटारसायकलवरून पडून गंभीर जखमी झालेल्या चिपळूणमधील एका ५९ वर्षीय महिलेचा कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुप्रिया सुरेश उदेग (वय ५९, रा.कोडमळा, ता. चिपळूण) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ही घटना १ फेब्रुवारी २०२६ रोजी चिपळूणमधील ओमळी येथे घडली होती. सुप्रिया उदेग या मोटारसायकलवरून जात असताना त्यांचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. त्यांना तात्काळ उपचारासाठी कोल्हापूर येथील विन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button