आजपासून बारावीची परीक्षा सुरू


मंडळाची बारावीची परीक्षा आज इंग्रजी विषयाने सुरू झाली. कोकण विभागीय मंडळ अंतर्गत २४,०१० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 38 परीक्षा केंद्रांतर्गत 15713 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 23 परीक्षा केंद्रात 8297 परीक्षार्थी आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक वर्ग खोलीत बसवले आहेत तर रत्नागिरी केवळ एका परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. चिपळूण येथील या केंद्रावर आज व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. शिक्षणाधिकारी माध्यमिक दीपक मेंगाने यांनी जाकादेवी आणि वाटद खंडाळा या केंद्रांना भेटी दिल्या.

दोन्ही जिल्ह्यात परीक्षा सुरळीत पार पडली. कोणत्याही गैरप्रकाराची नोंद नाही. प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्हीच्या निगराणीखाली परीक्षा होत आहे. त्यामुळे शिस्तबद्ध परीक्षा होत आहे.

“दोन्ही जिल्ह्यात दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने परीक्षेचे योग्य नियोजन झालेले आहे. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने आणि सीसीटीव्हीमुळे परीक्षा सुरळीत पार पडेल. गैरप्रकार करणारे त्यांना मदत करणारे अथवा उत्तेजन देणारे यांची गय केली जाणार नाही.
-राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष कोकण मंडळ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button