
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या अलंकार परीक्षेत केदार लिंगायत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या गायन, वादन केदार लिंगायत आणि नृत्य अलंकार परीक्षेत रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. त्यामध्ये तबला विषयात केदार लिंगायत हे अलंकार परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. लहानपणापासूनच केदार यांना वादनाचे बाळकडू मिळाले आहे; मात्र २००४ पासून केदार यांनी ’तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला (कै.) विनायकबुवा रानडे, हेरंब जोगळेकर, प्रसाद करंबेळकर आणि सध्या पंडित आमोद दंडगे यांच्याकडे तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेत आहेत, २०१३ पासून ते रियाज तबला ऍकॅडमी आणि स्वरनिनाद संगीत विद्यालयाच्या माध्यमातून वादनाची आवड असलेल्यांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच मुकुल माधव विद्यालय आणि जीजीपीएस स्कूलमधील (कै.) यशवंतराव पटवर्धन संगीत ऍकॅडमीमध्ये तबला संगीत शिक्षक म्हणून कार्य करत आहेत. सध्या १५० विद्यार्थी लिंगायत यांच्याकडे तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेत आहेत.www.konkantoday.com




