
सेंट थॉमस स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा
शासकीय रेखाकला परीक्षेत श्रेयस संतोष जाधव राज्य गुणवत्ता यादीत
रत्नागिरी : राज्य कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत कारवांचीवाडी येथील सेंट थॉमस स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. शाळेचा विद्यार्थी श्रेयस संतोष जाधव याने राज्य गुणवत्ता यादीमध्ये २१ वा क्रमांक मिळविला आहे. श्रेयस जाधवने डिझाईन विषयात राज्यात तिसरा, जिल्ह्यात दुसरा तर केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
इंटरमिजिएट परीक्षेला एकूण ४२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल १००% लागला. एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेला ३० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याही परीक्षेचा निकाल १००% लागला
शाळेतील सर्व विद्यार्थ्याच्या व श्रेयस जाधव याचे उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापक फादर थॉमस, मुख्याध्यापक फादर जॉर्ज, मार्गदर्शक कलाशिक्षक राहुल कळंबटे, शिक्षिका नेहा कांबळी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.




