
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी विदर्भातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पांमधून तारा आणि चंदा या दोन वाघिणी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी विदर्भातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पांमधून तारा आणि चंदा या दोन वाघिणी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यात आल्या आहेत.त्यांनी पिल्ले दिली तर उर्वरित वाघांचे स्थलांतर करण्याची गरज पडणार आहे. सह्याद्रीत दाखल झालेल्या वाघिणींचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घाबरण्याचे काही कारण नाही, अशी माहिती या प्रकल्पाचे उपसंचालक तुषार चव्हाण यांनी दिलीसह्याद्री व्याघ्रप्रकल्पात पूर्वी तीन वाघ होते. यातील एक वाघ कोयनेच्या जंगलात तर दोन चांदोलीच्या जंगलात आहेत. कोयना आणि चांदोली अभयारण्य मिळवून सह्याद्री व्याघ्रप्रकल्प झाल्यानंतर येथे वाघांची प्रजनन संख्या वाढवण्यासाठी ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्रप्रकल्पमधून ८ वाघ आणण्याची परवानगी शासनाने दिली आहे. पहिल्या टप्प्यात दोन वाघिणींचे स्थलांतर यशस्वीपणे पूर्ण झाले आहे.




