
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात सरलमानक संस्कृत कार्यशाळेचे आयोजन
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांचे भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काळे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र तसेच भारतीय भाषा समिती शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आणि संस्कृत विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी संस्कृत शिक्षक मंडळ रत्नागिरी यांच्या सहयोगाने सरलमानक संस्कृतम् या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
ही कार्यशाळा दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात अखिल भारतीय गीताशिक्षणकेंद्र प्रमुख श्री शिरीष भेडसगावकर , माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री दीपक मेंगाणे, संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा स्मिता सरदेसाई उपस्थित राहणार आहेत. सोबतच उपकेंद्र संचालक डॉ दिनकर मराठे आणि कला शाखा उपप्राचार्य डॉ कल्पना आठल्ये उपस्थित असणार आहे.
या कार्यशाळेत संस्कृत शिक्षकांना केंद्रस्थानी ठेवून ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक शिरीष भेडसगावकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखा उपप्राचार्या आणि संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, प्रा अविनाश चव्हाण, प्रा पूर्वा चुनेकर आणि डी बी जे महाविद्यालयातील संस्कृत शिक्षिका डॉ. माधवी जोशी आपले विचार प्रस्तुत करणार आहेत. या एकदिवसीय कार्यशाळेचे समापन सत्रात विशेष अतिथी डॉ. गोपीकृष्ण रघु उपस्थित राहणार आहे.
याच कार्यशाळेला जोडून दिनांक ९ ते १० जानेवारी २०२६ या दोन दिवशी संस्कृत माध्यमातून संस्कृत शिक्षण (संस्कृत माध्यमेन संस्कृत शिक्षणं) या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी अर्थात ९ जानेवारी २०२६ रोजी उद्घाटन सत्रात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक महाबल भट्ट, शिक्षण विस्तार अधिकारी (प्राथमिक) नरेंद्र गावंड, रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखा उपप्राचार्या आणि संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा स्मिता सरदेसाई उपस्थित राहणार आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक प्रणालीच्या अनुषंगाने महाबल भट्ट, के जी महेश , डॉ संभाजी पाटील, डॉ राजेंद्र सावंत आशिष आठवले, डॉ गोपीकृष्ण रघु, चिन्मय आमशेकर, प्रा अविनाश चव्हाण आणि डॉ कार्तिक राव उपस्थित राहणार आहेत.




