
भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्याचिंचखरी येथील रस्ता डांबरीकरण कामाचे भाजप तालुका अध्यक्ष दादा दळी यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन संपन्न..
या विषयी सविस्तर वृत्त असे की भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या शिफारशीनुसार रत्नागिरी तालुक्यात ४ कोटी रुपयांचा ग्रामविकास मंत्रालयाचा विकास निधी प्राप्त झाला..यातील सोमेश्वर चिंचखरी येथे किशोर बोरकर यांच्या घरापासून नितीन बोरकर यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे या कामाचे भूमिपूजन भाजप तालुका अध्यक्ष दादा दळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले..या रस्त्याचा फायदा चिंचखरी येथील २५ घरांना होणार आहे.त्यामुळे ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.यावेळी सरपंच दीपश्री पाटील मॅडम, ग्राम पंचायत सदस्य वैशाली बोरकर, नितीन बोरकर, संतोष बोरकर, किशोर बोरकर, गुरुदास गोविलकर, राजा सांडीम, मंदार चव्हाण, भाऊ केळकर, प्रभाकर लिमये, अभी बोरकर, ऋग्वेद दळी, सूरज बोरकर आदी उपस्थित होते.
ग्रामस्थानी चव्हाण साहेब, अनिकेत पटवर्धन , तालुका अध्यक्ष दादा दळी, संतोष बोरकर यांचे आभार मानले.




