
२२ जानेवारीपासून रत्नागिरीत ‘श्री रत्नागिरीचा महागणपती’ माघी गणेशोत्सवाचा भव्य सोहळा
भक्ती, संस्कृती आणि सामाजिक उपक्रमांचा संगम. *महिलांसाठी हळदीकुंकू आणि ''पैठणी सम्राज्ञी २०२६” खेळ तर युवकांसाठी खास ‘’महागणपती reel’’ स्पर्धा



रत्नागिरी :
धार्मिक आणि सामाजिक अधिष्ठान असलेल्या सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने ‘श्री रत्नागिरीचा महागणपती’ माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हा उत्सव गुरुवार, २२ जानेवारी २०२६ ते बुधवार, २८ जानेवारी २०२६ या कालावधीत उत्सवात दररोज धार्मिक विधी, भजन-कीर्तन, सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या माघी गणेशोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. यंदा उत्सवाची सुरुवात गुरुवार, २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता श्रींच्या विधी विधिवत प्राणप्रतिष्ठापनेने होणार आहे. तर रात्री ८ वा. बुवा श्री उदय मेस्त्री आणि श्री स्वामी समर्थ प्रसादिक भजन मंडळ, केळ्ये यांच्या सुमधुर भजनांनी वातावरण भक्तिमय होणार आहे.
शुक्रवार, २३ जानेवारी रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा असून संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू व तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री ८ वा. बुवा श्री. गौरव पांचाळ व साई प्रसादिक भजन मंडळ, फुणगूस, ता. संगमेश्वर यांच्या भजनसेवेचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
शनिवार, २४ जानेवारी रोजी कृ. चि. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांचे सकाळी ९ वा. अथर्वशीर्ष पठण तर सायंकाळी ७ वा. ह.भ.प. श्री प्रवीण मुळ्ये यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले असून, कीर्तनाचा विषय “गणेश पुराण सार” असा असेल. या कार्यक्रमातून गणेशभक्तांना अध्यात्मिक ज्ञानाची पर्वणी मिळणार आहे.
रविवार दि. २५ जानेवारी २०२६ या दिवशी सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात आला आहे.
सकाळी ८ वा. मंडळातर्फे सांबरे हॉस्पिटलच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तर सायंकाळी ७ वा. खास महिलांसाठी ”पैठणी सम्राज्ञी २०२६” हा पारंपरिक खेळ आयोजित करण्यात आला असून, मानाची पैठणी तसेच सरप्राईझ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सोमवार, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळी ८ ते ११ या कालावधीत जिलेबी वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर संध्याकाळी ७ वा. ‘स्वरसमर्पण’ हा भक्तिपर व देशभक्तीपर गीतांचा विशेष कार्यक्रम होणार आहे. स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या काही गीतांचाही यात समावेश करण्यात येणार आहे.
मंगळवार दि. २७ जानेवारी २०२६ या दिवशी सकाळपासून धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार आहेत. सकाळी ७ वा. जी जी पी एस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण होणार आहे. सकाळी १० वा. बुवा श्री. साहिल सावंत व श्री. सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ उक्षी यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. दुपारी १२ वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी ७ वा. महाआरती होणार असून, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तसेच बुवा उमेश लिंगायत, हरिनाम भजन मंडळ, संगमेश्वर भजन सेवा सादर करणार आहेत.
त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
उत्सवाची सांगता बुधवार, २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून श्रींच्या भव्य विसर्जन मिरवणुकीने होणार आहे.
या महाउत्सवाच्या निमित्ताने भक्तांसाठी दररोज लकी ड्रॉ निघणार असून उत्सव काळात दररोज संध्याकाळी विजेते जाहीर होणार आहेत. २२ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ”एक दिवस महागणपती सोबत” आणि ” माझी एक चांगली सवय महागणपतीसाठी” असे विषय देण्यात आले आहेत. याचे बक्षीस वितरण २७ जानेवारीरोजी होणार आहे. या स्पर्धांबाबत आणि लकी ड्रॉ बाबत लवकरच सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
तरी सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने ”श्री रत्नागिरीचा महागणपती” च्या दर्शनासाठी भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश मगदूम, उपाध्यक्ष सौ. अनुष्का शेलार, सचिव प्रवीण लिंगायत, सहसचिव अनघा निकम मगदूम, खजिनदार अमोल देसाई यांच्यासह श्री. मनोज घडशी सल्लागार तसेच श्री. अमित देसाई, सौ. अश्विनी देसाई, सौ. प्रियल जोशी, श्री. राहुल भाटकर, श्री. निखील शेट्ये, श्री. रोहित भुजबळराव, श्री. रामदास शेलटकर, श्री. अजय लिंगायत श्री. राजेश झगडे, श्री. साईनाथ सावंत, श्री. अमृत गोरे, श्री. श्रीनाथ सावंत, श्री. सागर सोलकर, श्री. अभिलाष कारेकर, श्री. सतीश लिंगायत, श्री. ययाती शिवलकर, श्री. कृष्णा पाटील, श्री. विशाल कांबळे, श्री. रुद्र भोळे, श्री. नितीन पवार, श्री. दुर्गेश पिलणकर, श्री. सिद्धेश धुळप सौ. प्रणाली धुळप, श्री. प्रणव सुर्वे, श्री. उद्देश लाड, श्री. अंकुर मोहिते, श्री. ओमकार आंग्रे, श्री. योगेश साळवी, श्री. रतिकेश खानविलकर, श्री. ऋषिकेश पाटील, श्री. राज भातडे, श्री. शिवाजी कारेकर, श्री. प्रताप भानुशाली, श्री. शोएब खान, श्री. संदेश लिंगायत, श्री. संतोष पवार, श्री. अरुण माने यांचा या उत्सवात प्रामुख्याने सहभाग आहे.




