
रत्नागिरीत शिवसेनेतर्फे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी
रत्नागिरी : शिवसैनिकांच्या वात्सल्यमूर्ती स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती म्हणजे ममता दिनानिमित्त आज (६ जानेवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, महिला आघाडी यांच्यावतीने
शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात माँसाहेबाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महिला उपजिल्हा संघटक सौ. ममता जोशी व विधानसभा क्षेत्र संघटक सौ. सायली पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, उपतालुकाप्रमुख सुभाष रहाटे, विजय देसाई, उपतालुका संघटक सौ. गंधाली मयेकर, रेश्मा कोळंबेकर, विभागप्रमुख किरण तोडणकर, उपविभागप्रमुख सचिन सावंतदेसाई, विभागप्रमुख राजेंद्र नेरकर, राजाराम रहाटे, साजिद पावसकर, शशिकांत बारगोडे, नयन साळवी, विभाग संघटक पूजा जाधव, उपविभाग संघटक सौ. मिताली पवार, शाखा संघटक रंजना ढेपसे, अंकुश जोशी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



