
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून सुरेश कलमाडी यांची तब्येत बिघडली होती.पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात सुरेश कलमाडी यांच्यावरती उपचार सुरू होते. आज दुपारी सुरेश कलमाडी यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.पुण्याचे खासदार म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते आणि त्यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही पद भूषवलं होतं. विशेष म्हणजे, रेल्वे राज्यमंत्री असताना रेल्वे बजेट मांडणारे ते एकमेव राज्यमंत्री ठरले होते. पुण्यात ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ यांसारख्या उपक्रमांची सुरुवात करून त्यांनी शहराला एक नवी ओळख मिळवून दिली.




