
जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा बुधवारपासून डेरवण येथे
रत्नागिरी, दि.6 ) : जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) विभागाच्या जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा 7 व 8 जानेवारी 2026 रोजी डेरवण येथील श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट स्पोटर्स ॲकॅडमी येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन 7 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते व गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे, यावेळी नागरिकांनी व क्रीडाप्रेमीनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक/योजना) किरण लोहार, शिक्षणाधिकारी माध्यमिक दिपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) चंद्रकांत सूर्यवंशी व उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनिता शिरभाते यांनी केले आहे.
यावेळी खासदार सुनिल तटकरे, नारायण राणे, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य भास्कर जाधव, शेखर निकम, किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील, विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक श्रीकांत पराडकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 8 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. 7 जानेवारी रोजी मोठा गट मुलगे/मुली व 8 जानेवारी रोजी लहान गट मुलगे/मुली यांच्या सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व स्पर्धकांनी व मार्गदर्शक शिक्षकांनी दोन्ही दिवशी वेळेत उपस्थित रहावे.




