
चिपळूणात गहाळ ५८ मोबाईलचा यशस्वी शोध, मूळ मालकांच्या स्वाधीन
प्रवासात असणाऱ्या लोकांचे गहाळ होणारे मोबाईल पोलिस तपासात सापडलेले तब्बल ४४ मोबाईल संबंधीत लोकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या हस्ते मुळ मालकांना या मोबाईलचे वितरण करण्यात आले.अनेकवेळा एसटी रेल्वे प्रवासात याशिवाय अन्यत्र मोबाईल गहाळ होत असतात. त्याची चोरी देखील होत असते. या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिस ठाण्यात अर्ज केले जातात. त्यानुसार या मोबाईलचा शोध घेतला जातो व पोलिसांत नोंद ठेवली जाते.
असे तपासात मिळालेले तब्बल ४४ मोबाईल संबंधीत मालकांना परत देण्यात आले. जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलिस अधिक्षक महामूनी, चिपळूण डीवायएसपी प्रकाश बेले, पोलिस निरीक्षक मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष शिंदे, वर्षा रहाटे यांनी गहाळ मोबाईलचा शोध घेतला आणि ५८ मोबाईल शोधण्यात यश आले. त्यातील ४४ मोबाईल मुळ मालकांना परत देण्यात आले. चिपळूण पोलिस ठाण्यात मोबाइलचे वितरण करण्यात आले




