
गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांसाठी मालगुंड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय मदत केंद्र
गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या वतीने मंदिर परिसरात वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात आले होते.
या मदत केंद्रामध्ये भाविकांची आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी तसेच किरकोळ आजारांवर तात्काळ उपचार करण्यात आले. उष्माघात, चक्कर येणे, थकवा, डोकेदुखी आदी तक्रारींवर प्राथमिक उपचार देण्यात आले. गरज भासल्यास पुढील उपचारासाठी मार्गदर्शनही करण्यात आले.
आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सतर्क राहून सेवा दिल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी आरोग्य सेवेची उपलब्धता असल्याने कोणतीही गंभीर घटना घडली नाही. अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेली ही व्यवस्था स्तुत्य ठरली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये साहेब तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव यांचे मार्गदर्शना खाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी यांनी या वेळी आरोग्य सेवा दिली भाविकांनी समाधान व्यक्त केले 🙏




