
आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त भांबेड जिल्हा परिषद गटात विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप
भांबेड (ता. लांजा) — आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भांबेड जिल्हा परिषद गटात विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वितरित करण्यात आल्या. शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची मदत मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जातील, असे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद माजी अध्यक्ष जगदीश राजपकर, जिल्हा बँक संचालक मुन्ना खामकर,सरपंच विनिता गांगण विनय गांगण दिलीप भाऊ देसाई राजू शेठ गांधी , महेश विश्वासराव, प्रमोद गुरव, प्रियंका रसाळ सोनिया गांधी ,आर्या आयरे, बेर्डे मॅडम शाखाप्रमुख शाळेच्या मुख्याध्यापिका व विद्यार्थी मित्र
स्थानिक पदाधिकारी, शिक्षकवर्ग, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आमदार किरण सामंत यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करून या उपक्रमाबद्दल जिल्हा बँकेचे संचालक मुन्ना खामकर यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.




