
माहे फेब्रुवारी करिता तालुकानिहाय धान्य साठ्याचे वितरण
रत्नागिरी, दि. ५ ) : माहे फेब्रुवारी 2026 करिता जिल्ह्यातील 9 लाख 93 हजार 244 प्राधान्य कार्ड धारक सदस्यांकरिता प्राधान्य तांदूळ 2559.50 मे.टन व गहू 1862 मे.टन नियतनाची भारतीय अन्न महामंडळ पनवेल यांच्याकडून प्राधान्यची उचल कराण्यात आली असून माहे फेब्रुवारी 2026 करिता तालुकानिहाय धान्य साठ्याचे वितरण करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यानी कळविले आहे.
माहे फेब्रुवारी 2026 करिता मंडणगड तालुक्यात 40 हजार 778 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी 119.50 मे.टन तांदूळ तर 81 मे.टन गहू , दापोली तालुक्यात 1 लाख 16 हजार 891 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी 294.50 मे.टन तांदूळ तर 216.50 मे.टन गहू , खेड तालुक्यात 1 लाख 12 हजार 993 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी 248.50 मे.टन तांदूळ तर 222.50 मे.टन गहू, गुहागर तालुक्यात 74 हजार 546 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी 212.50 मे.टन तांदूळ तर 138 मे.टन गहू, चिपळूण तालुक्यात 1 लाख 48 हजार 307 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी 386 मे.टन तांदूळ तर 274 मे.टन गहू, संगमेश्वर तालुक्यात 1 लाख 23 हजार 947 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी 363 मे.टन तांदूळ तर 247 मे.टन गहू, रत्नागिरी तालुक्यात 2 लाख 5 हजार 631 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी 514.50 मे.टन तांदूळ तर 383 मे.टन गहू, लांजा तालुक्यात 65 हजार 94 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी 179 मे.टन तांदूळ तर 104 मे.टन गहू, राजापूर तालुक्यात 1 लाख 5 हजार 57 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी 242 मे.टन तांदूळ तर 196 मे.टन गहू चे वितरण करण्यात आले आहे.
माहे फेब्रुवारी साठी प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांकरिता धान्याचे वितरण प्रति व्यक्ती 5 किलो प्रमाणात करावयाचे असून त्यामध्ये प्राधान्य तांदूळ 3 किलो व गहू 2 किलो असे असेल.
000




