
दोन वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात 355 एसटी अपघात
रत्नागिरी विभागात 2025 यावर्षी चालकांकडून एसटी बसेस चालवल्या गेल्या मात्र, काहींनी निष्काळजीपणामुळे तर ब्रेकफेल, टायर फुटल्यामुळे, काही रस्त्यांच्या कामामुळे, तांत्रिक कारणामुळे एसटी अपघात झाले.2024 व 2025 या दोन वर्षांत किरकोळ, गंभीर, प्राणांतिक मिळून 355 एसटी अपघात झाले असून त्यामध्ये 195 गंभीर अपघात आहेत, तर 2025 यावर्षी रत्नागिरी विभागात 182 एसटी अपघात झाले आहेत. त्यामध्ये 99 अपघात गंभीर, 76 किरकोळ तर उर्वरित सात अपघात प्राणांतिक आहेत. एसटीकडून दरवर्षी सुरक्षा अभियान घेऊनही एसटी अपघातात वाढ होत आहे.




