देवरूखात भाजप तालुकाध्यक्ष श्री. रुपेश कदम यांनी मार्लेश्वर फाटा येथे भाजप नेते प्रशांत यादव यांच्या वाढदिवसाच्या निमित्त लावलेला बॅनर अज्ञातानी फाडला.


  • चिपळूण येथील* भाजप नेते श्री. प्रशांत यादव यांच्या वाढदिवसानिमित्त देवरूख तालुक्यात ठिकठिकाणी शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले होते. त्याच अनुषंगाने भाजप तालुकाध्यक्ष श्री. रुपेश कदम यांनी मार्लेश्वर फाटा येथे शुभेच्छा देणारा बॅनर लावला होता. मात्र अज्ञात व्यक्तींनी हा बॅनर जाळल्याची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या राज्यभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपने राज्यभरात मोठे यश मिळवले असून, आगामी महापालिका निवडणुकांमध्येही अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अशा पार्श्वभूमीवर बॅनर फाडणे किंवा जाळणे ही घटना अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया रुपेश कदम यांनी दिली.

दरम्यान, ही घटना विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवणारी असून, पराभव समोर दिसत असल्याने त्या मानसिकतेतून केलेले हे कृत्य आहे, अशा शब्दांत भाजप नेते प्रमोद अधटराव यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button