
गोवा ते मुंबई सुपरफास्ट प्रवासासाठी ओळखली जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसचा प्रवास होतोय हल्ली रखडत,
गोवा ते मुंबई सुपरफास्ट प्रवासासाठी ओळखली जाणारी गाडी क्रमांक २२१२० तेजस एक्सप्रेस तब्बल ६ तास ४५ मिनिटे उशिराने धावल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.कोकण रेल्वेच्या या विलंबामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. रात्री ११:१५ च्या सुमारास प्रवाशांना जेवण देण्यात आले, जे गाडीच्या मूळ वेळेनुसार तयार केल्यामुळे पूर्णपणे थंड झाले होते. मधुमेह असलेल्या रुग्णांना औषधे आणि जेवणासाठी ताटकळत राहावे लागले. मध्यरात्री २:३० वाजता गाडी ठाण्यात आली असती, तर टॅक्सीवाल्यांना अव्वाच्या सव्वा पैसे देऊन घरी कसे जायचे? असा संतप्त सवाल ज्येष्ठ नागरिक शरद कदम यांनी उपस्थित केला. तसेच स्टेशनवर ताटकळत असताना साध्या शौचालयासाठीही पैसे मोजावे लागल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.




