
आता प्रत्येक केंद्राला एक क्रीडाशिक्षक; जिल्हा परिषद शाळांसाठी मोठा निर्णय
राज्य सरकारने आता गुणवत्तेसोबतच क्रीडा शिक्षणालाही महत्व दिल्याचे समोर येत आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषद शाळांच्या प्रत्येक केंद्रासाठी एक क्रीडा शिक्षक नेमण्याबाबत शासनाने आदेश काढले आहेत.या आदेशानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 246 पदांची लवकरच ही भरती होणार असून, क्रीडा शिक्षकांसाठी ही मोठी संधी समजली जात आहे. विशेष म्हणजे, क्रीडा शिक्षक मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या शाळांतूनही चांगले खेळाडू घडणार आहेत.राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत समूह साधन केंद्राची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यात सध्या 4860 समूह साधन केंद्र आहेत. केंद्र स्तरावर आता प्रत्येकी एक क्रीडा शिक्षकाचे पद मंजूर करण्यात आले आहे. लवकरच, केंद्रस्तरीय विशेष शिक्षक पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे क्रीडा शिक्षकांमधून आनंदाचे वातावरण आहे




