७ व ८ फेब्रुवारीला रत्नागिरीत राज्यस्तरीय ग्रंथालय अधिवेशन


महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, कोकण विभाग ग्रंथालय संघ व रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वार्षिक संयुक्त ग्रंथालय अधिवेशन शनिवार व रविवार दि. ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी ऐतिहासिक रत्नागिरी नगरीत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय अधिवेशनाचे अध्यक्षस्थान डॉ. गजानन कोटेवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ भूषविणार असून अधिवेशनाचे उद्घाटन उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत याच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री (गृह व महसूल) ना. योगेश कदम उपस्थित राहणार आहेत अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष उद्योजक दीपक गद्रे असून उद्घाटन सत्रात ज्येष्ठ साहित्यिक कृष्णाजी कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय अशोक गाडेकर (ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य), श्याम जोशी (विश्वस्त, ग्रंथसखा वाचनालय), प्रशांत पाटील (सहाय्यक ग्रंथालय संचालक, कोकण विभाग) यांच्यासह गुलाबराव पाटील, सोपानराव पवार, राम मेकले, भीमराव पाटील, नंदू बनसोड, सुनील कुबल आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button