‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे 350 शहिदी समागम शताब्दी वर्ष



“हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई, जि. ठाणे येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व “हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वी शहीदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती”, शीख- सिकलीकर, बंजारा लबाना, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
श्री गुरु तेग बहादूर हे शिख धर्माचे ९ वे गुरू होते, त्यांना हिंद की चादर म्हणून ओळखले जाते. श्री गुरु तेग बहादुर यांनी शिख धर्मात प्रार्थना, परोपकार, सेवा, साधेपणा, इतरांच्या सेवेला महत्व आणि निर्भीडपणा यांचा प्रचार केला, त्यांचे प्रवचन व भजन यांचा “गुरु ग्रंथ साहिब” यामध्ये देखील समावेश आहे. श्री गुरु तेग बहादुर यांनी १७ व्या शतकामध्ये तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरूद्ध आवाज उठवून धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी बलिदान देऊन भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे रक्षण केले. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात तसेच शिख धर्मात शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक मजबूत झाली. मुघल सम्राटांच्या विरोधात जाऊन भाई लकीशा बंजारा यांनी नववे गुरु तेग बहादूर यांच्या पवित्र शरीरास आपला तांडा व घर जाळून अग्नी दिला. या बाबीस भारतीय इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे.
श्री गुरु तेग बहादूर यांचे सन २०२५ हे ३५० वे शहिदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहीत व्हावा तसेच त्यांनी केलेला प्रचार व दिलेले बलिदान याचे स्मरण होण्याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याकरिता “हिंद-की- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी ३५० वी शहिदी समागम शताब्दी तसेच गुरु गोविंदसिंग, गुरु-ता-गद्दी समागम समिती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली. त्यानुषंगाने मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १३ जून २०२५ रोजी “हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वी शहिदी समागम शताब्दी तसेच गुरु गोविंदसिंग, गुरु-ता-गद्दी समागम समितीची याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता, राज्यस्तरीय समन्वय समिती, क्षेत्रीय आयोजन समिती व विविध कार्यक्रम आयोजन व्यवस्था समिती इ. समित्या दि. १२ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आल्या आहेत.
“हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई, जि. ठाणे येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व “हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी ३५० वी शहिदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती”, शीख- सिकलीकर, बंजारा लबाना, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण व त्यात समाविष्ट असलेले जिल्हे :-
नांदेड – छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर, धाराशिव, हिंगोली, बीड, नंदुरबार, धुळे, जळगाव
नागपूर – वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम
नवी मुंबई – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक
“हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई, जि. ठाणे येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व “हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी ३५० वी शहिदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती शीख-सिकलीकर, बंजारा लबाना, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
हिंद की चादर श्री. गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त नांदेड, नागपूर व नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता आवश्यक शिफारशी करण्यासाठी नांदेड, नागपूर व नवी मुंबई जि. ठाणे या ३ ठिकाणी क्षेत्रीय आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे.
क्षेत्रीय आयोजन समितीची कार्यकक्षा :- नवी मुंबई, जि. ठाणे या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनाकरिता वेळोवेळी आढावा घेवून कालबद्ध कार्यक्रम निश्चित करणे,
कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शक समिती तसेच आयोजन व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यासाठी जिल्हास्तर आयोजन व व्यवस्थापन समितीस शिफारस करून त्यांची वेळोवेळी आढावा बैठक घेणे व त्याची माहिती राज्यस्तरीय समितीस व अल्पसंख्याक विकास विभागास सादर करणे.
या कार्यक्रमाचे योग्य नियोजन, परिणामकारक अंमलबजावणी याकरिता आयोजन समन्वय समिती, व्हीआयपी व्यवस्थापन समिती, सभागृह व्यवस्थापन समिती, प्रशासन व्यवस्थापन समिती, मैदान व्यवस्थापन समिती, मंडप व्यवस्थापन समिती, बैठक व स्वागत व्यवस्थापन समिती, अतिथी व्यवस्थापन समिती, निवास व्यवस्थापन समिती, नाव नोंदणी व्यवस्थापन समिती, प्रदर्शनी व्यवस्थापन समिती, प्रचार व प्रसार व्यवस्थापन समिती, दक्षता व्यवस्थापन समिती, महिला सुरक्षा व्यवस्थापन समिती, आपात्कालीन व्यवस्थापन समिती, पाणीपुरवठा व्यवस्थापन समित्ती, स्वच्छता व्यवस्थापन समिती, स्वरुपा व्यवस्थापन समिती, सार्वजनिक परिवहन व्यवस्थापन समिती, जूताघर व्यवस्थापन समिती, लंगर व्यवस्थापन समिती तसेच स्थानिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्यकता असलेल्या समित्या स्थापन करण्यासाठी जिल्हास्तर आयोजन व व्यवस्थापन समितीस शिफारस करणे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५१०१०१८५९४२७८१४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
000 – प्रशांत कुसुम आंनदराव सातपुते जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button