
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या हव्यासापायी एका तरुणाचा मुंबई लोकलमध्ये स्टंट
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या हव्यासापायी एका तरुणाने मुंबई लोकलमध्ये जीवघेणा स्टंट केला.
डॉकयार्ड रोडजवळ धावत्या ट्रेनवर स्टंट करतानाचा व्हिडिओ त्याने पोस्ट केला आणि तो व्हायरल झाला.
मात्र हाच व्हिडिओ त्याच्या अडचणीचे कारण ठरला आणि RPF ने त्याला अटक केली.
चौकशीत केवळ ‘लाइक्स’ आणि फेमस होण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली त्याने दिली.
रेल्वे कायद्यानुसार कारवाई करत त्याला धडा शिकवण्यात आला.
हा प्रकार तरुणांसाठी इशारा आहे – काही लाइक्ससाठी आपला अमूल्य जीव धोक्यात घालू नका




