सैन्यातील निवृत्ती वेतन मिळत नसलेल्या 65 वर्षावरील सैनिकांची/विधवांची माहिती दि. 30 जानेवारीपर्यंत द्या.


रत्नागिरी, दि. 20 ) : माजी सैनिक व्याख्येत न येणारे तसेच सैन्यातील निवृत्ती वेतन मिळत नसलेल्या 65 वर्षावरील सैनिकांची/विधवांची माहिती दि. 30 जानेवारी 2026 रोजी पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात स्वत: उपस्थित राहून सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केली आहे.
आर्मी नंबर, रँक व नाव, भरतीची तारीख, निवृत्तीची तारीख, निवृत्तीचे कारण , चारित्र्य, युध्दात सहभाग असल्यास तपशिल याची माहिती आवश्यक आहे.
सैन्‍य सेवा केलेले परंतु सैनिक व्याखेत न बसणारे 65 वर्षांवरील व्यक्ती (विधवांसाठी वयाची अट नाही), सैन्यसेवेतून बडतर्फ झालेला नसावा. केएसबी/झेडएसबी कडून चरितार्थासाठी आर्थिक मदत मिळण्यास पात्र नसलेला, अर्धसैनिक बल मधील नसावा. Territorial Army मध्ये सेवा केलेल्या सैनिकांचा समावेश करावा. चरितार्थासाठी उत्पन्नाचे काहीही साधन नसलेल्या व्यक्तींचाच समावेश करावा.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button