सिद्धेश्वर निवे संघ ठरला ‘सरपंच कै. सौ. वैजयंती करंडे’ चषकाचा विजेता

माळवाशी कडूवाडी येथील क्रिकेट स्पर्धा उत्साहात; तुळसणी उपविजेता

देवरूख :

संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथे नुकत्याच झालेल्या टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत सिद्धेश्वर निवे संघ विजेता ठरला. सरपंच कै. सौ. वैजयंती करंडे स्मृती चषक देऊन या संघाला मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

ओम साई सेवा मंडळ कडूवाडी व निनावी देवी क्रीडा मंडळाच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला 25 हजार 555 व चषक देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक जेतवन तुळसणी संघाने तर तृतीय युवा स्पोर्ट देवरूख, चतुर्थ क्रमांक ओम साई कडूवाडी संघाने पटकावला. या संघांना अनुक्रमे 15 हजार 555 रुपये व चषक, 5 हजार 555 रुपये व चषक, 3 हजार 333 रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज मुशरफ मुकादम, उत्कृष्ट गोलंदाज गिरीश कोचिरकर, मालिकावीर पार्थ गांधी यांना चषक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरणावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, भाजपा संघटक प्रमोद अधटराव, प्रफुल्ल बाईत, उद्योजक सुरेश कदम, युवा नेते प्रद्युम्न माने, सरपंच निकिता करंडे, उपसरपंच सुनील सावंत, राजू सावंत, दिलीप कडू, कडूवाडी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कडू, सायली सावंत, बाळकृष्ण करंडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप कडू यांनी केले.

यावेळी रोहन बने मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कडूवाडी मंडळाचे क्रीडा क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. दरवर्षी मोठमोठ्या स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना व्यासपीठ देण्याचे काम कडूवाडी मंडळ करत आहे, असे बने म्हणाले. प्रफुल्ल बाईत म्हणाले, मुंबईसह गावातील ग्रामस्थांनी इतकी मोठी स्पर्धा कडूवाडीत भरवली. या स्पर्धेचे नियोजन कौतुकास्पद आहे. उपसरपंच सुनील सावंत म्हणाले, मागील अनेक वर्षे इतकी मोठी स्पर्धा कडूवाडी मंडळ राबवत आहे. यामुळे येथील ग्रामस्थांना नावाजलेल्या खेळाडूंचा खेळ पाहायला मिळतो. या मंडळाचे सर्वच कार्यकर्ते मेहनत घेतात.

चार षटकांचे हे सामने ओपन व पंचक्रोशीतील स्तरावर कै. पांडुरंग करंडे व कै. शिवराम कडू क्रीडा नगरीत खेळवण्यात आले. महेंद्र कडू, विशाल भडवलकर, जितेंद्र कडू, विकास कडू, प्रतीक कडू, विशाल कडू, प्रवीण करंडे, महेश सावंत, सखाराम रावणंग, प्रकाश रावणंग, अथर्व कडू यांच्यासह कडूवाडी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button