
सागवे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार
राजापूर तालुक्यातील सागवे गावात गेले महिनाभर बिबट्याचा वावर असून अनेक तक्रारी करूनही याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती गोठीवरेचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आंबेलकर यांनी दिली.
बिबट्याचा मानवी वस्तीत असलेला शिरकाव, जनावरांवरील हल्ले आणि त्यामुळे त्याची दहशत वाढली आहे. या परिसरातील हमदारे, वडप, चिंचाडी आणि गोठीवरे आदी ठिकाणी बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झघले आहे. गोठीवरे येथील प्रकाश आंबेलकर यांच्या घराजवळ असणार्या गोठ्यामधील गायीच्या वासराला ठार केले. तर मागील कित्येक दिवस बिबट्या गोठिवरे परिसरात वारंवार दिसून येत असल्याने त्याचे वास्तव्य गोठीवरे ठिकाणीच असावे असा अंदाज ग्रामस्थांमधून वर्तविला जात आहे.www.konkantoday.com




