
संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथील विद्यार्थ्यांचा प्रजासत्ताक दिनी गौरव
रत्नागिरी, दि. 29 ) : संविधान दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेमध्ये महाविद्यालयस्तर व उच्च माध्यमिकस्तरातून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथील विद्यार्थ्यांचा प्रजासत्ताक दिनी सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
दि. 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर व समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माहे नोव्हेंबर २०२५ मध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आलेली होती. या निबंध स्पर्धेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह रत्नागिरी येथील विद्यार्थी कु.चिंतामणी प्रेमसागर घोडके यांना महाविद्यालयीन स्तरामध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक व कु. हर्ष दिलीप जाधव यांना उच्च माध्यमिक स्तर (वर्ग 11 वी व 12 वी) मध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले. या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्याकडून प्रशस्तीपत्र व रु. 3 हजारांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण दीपक घाटे आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी अपुर्वा अनिल कारंडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व धनादेश देऊन गौरविण्यात आले.
000




